दीर्घांक स्पर्धा २०२१

Posted on: April 21st, 2021 by admin

 

महाराष्ट्र कल्चरल सेंटर आयोजित- दीर्घांक स्पर्धा

प्रवेश अर्ज भरायची अंतिम तारीख: दि. १५ ऑक्टोबर २०२१

प्रवेशअर्ज: https://forms.gle/BGjneCqw25ETj5b58

१. या दीर्घांक स्पर्धेत मराठी व हिंदी या भाषांमध्ये ७० ते ९० मिनिटांचा दीर्घांक सादर करता येईल.

२. स्पर्धेत हौशी, प्रायोगिक, व्यावसायिक अशा कोणत्याही कलाकार, तंत्रज्ञ व संस्थांना सहभागी होता येईल.

३. २०२१ या वर्षीच्या स्पर्धेत सादर होणाऱ्या दीर्घांकाचे जानेवारी २०१९ ते मे २०२१ या कालावधीमध्ये जास्तीत जास्त प्रयोगांपेक्षा अधिक प्रयोग झालेले असू नयेत.

४. दीर्घांक इतर कलाकृतीवर आधारित, अनुवादित, रूपांतरित असले तरी चालतील. तसे असल्यास मूळ लेखक व कलाकृतीचा स्पष्ट उल्लेख असावा. तसा उल्लेख नसल्यास आणि तसे निदर्शनास आल्यास दीर्घांक कोणत्याही बक्षिसास पात्र ठरणार नाही.

५. जुन्या एकांकिका अथवा बहू-अंकी नाटकांवर आधारित किंवा संस्कारित दीर्घांक कोणत्याही बक्षिसास पात्र असणार नाही.

६. स्पर्धेत सादर होणारा दीर्घांक सेन्सॉर संमत असावा; किंवा सेन्सॉरसाठी तो सादर केल्याची शासकीय पावती आणि एका महिन्यासाठी सेन्सॉर बोर्डाची लेखी परवानगी असणे आवश्यक आहे.

७. या स्पर्धेतील सादरीकरणासाठी लेखकाचे परवानगी पत्र प्रवेशअर्जासोबत पाठविणे बंधनकारक आहे. संबंधित लेखकाच्या परवानगीसंदर्भात कोणत्याही प्रकारच्या तक्रारीस अथवा भरपाईस आयोजक संस्था जबाबदार असणार नाही. तसेच लेखन पारितोषिकासाठी दीर्घांक ग्राह्य धरावायचा असल्यास ‘लेखन पारितोषिकासाठी दीर्घांकाचा विचार व्हावा.’ असा स्पष्ट उल्लेख या पत्रात असावा.

८. ज्या संहितांचा पहिला प्रयोग दीर्घांक स्पर्धेत सादर होईल, केवळ अशाच संहिता लेखक पारितोषिकासाठी पात्र असतील.

९. कोविड – १९ च्या वर्षातील अडचणी लक्षात घेता, वर्ष २०२१ मधील प्राथमिक फेरी व्हिडिओ माध्यमाद्वारे घेण्यात येईल. प्राथमिक फेरीसाठी दीर्घांकाचे उत्तम स्वरूपाचे ध्वनिचित्रमुद्रण पाठवायचे आहे. हे ध्वनिचित्रमुद्रण व्हिडिओ लिंक द्वारे पाठवावे. ध्वनिचित्रमुद्रण पाठवायचा कालावधी २० ते ३० ऑक्टोबर २०२१. अंतिम फेरीसाठी प्रत्यक्ष सादरीकरण ज्योत्स्ना भोळे सभागृह, पुणे येथे होईल.

१०.  प्राथमिक फेरीचे सादरीकरण तालीम स्वरूपात पाठांतरासहित उत्तम ध्वनिचित्रमुद्रण स्वरूपात असावे.

११. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क रुपये १५००/- (रुपये एक हजार पाचशे मात्र) इतके आहे . प्रवेश शुल्क रोख , बँक ट्रान्स्फर अथवा डिजिटल पेमेंटद्वारे भरता येईल. स्पर्धेचे प्रवेशशुल्क कोणत्याही सबबीवर परत केले जाणार नाही.

१२. अंतिम फेरीतील सादरीकरण सुरु असताना काही आक्षेपार्ह भाग आढळल्यास आणि परीक्षकांनी हरकत घेतल्यास तो प्रयोग ताबडतोब थांबवण्यात येईल आणि तो संघ स्पर्धेतून बाद होईल. या संदर्भातील निर्णयाचे सर्व अधिकार परीक्षकांकडे असतील व त्याबाबतीत कोणतीही तक्रार चालणार नाही.

१३. स्पर्धेचा निर्णय अंतिम सादरीकरणानंतर काही वेळातच जाहीर केला जाईल आणि लगेचच पारितोषिक वितरण समारंभ पार पडेल. पारितोषिक वितरणाचेवेळी सहभागी संघांचा एकतरी अधिकृत प्रतिनिधी उपस्थित असणे अनिवार्य आहे. पारितोषिक कोणत्याही परिस्थितीत परगावी अथवा इतरत्र पोचविले जाणार नाही.

१४. प्रवेश अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख १५ जून २०२१  ही आहे.

१५ . प्राथमिक फेरीसाठीचे ध्वनिचित्रमुद्रण  २० ते ३० जून २०२१ या  कालावधीमध्ये पाठविणे अनिवार्य आहे. प्राथमिक फेरीचा निकाल जुलै २०२१ रोजी जाहीर केला जाईल.

१६. अंतिम फेरी जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पार पडेल.

 

अधिक माहितीसाठी संपर्क – सचिन जोशी ( ९९२३३९६६०२)

 

-:  पारितोषिके :-

 

१.  सर्वोत्कृष्ट दीर्घांक: प्रथम क्रमांक: रु. ३००००/-

२.  सर्वोत्कृष्ट दीर्घांक: द्वितीय क्रमांक: रु. २५०००/-

३.  सर्वोत्कृष्ट दीर्घांक: तृतीय क्रमांक: रु. २००००/-

४.  सर्वोत्कृष्ट दीर्घांक: महाविद्यालयीन संघ : रु. २००००/-

५.  सर्वोत्कृष्ट लेखक : प्रथम क्रमांक: रु. ५०००/-

६.  सर्वोत्कृष्ट लेखक : द्वितीय क्रमांक: रु. ३०००/-

७.  सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : प्रथम क्रमांक: रु. ५०००/-

८.  सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : द्वितीय क्रमांक: रु. ३०००/-

९.  सर्वोत्कृष्ट अभिनय: चार पारितोषिके: रु. ३०००/- प्रत्येकी

१०. सर्वोत्कृष्ट संगीत: रु. ३०००/-

११.  सर्वोत्कृष्ट नेपथ्य: रु. ३०००/-

१२. सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना: रु. ३०००/-

 

-:  आयोजक संस्थेतर्फे सहभागी संस्थांना खालील साहित्य पुरविले जाईल :-

१. पंधरा स्पॉट्स, ४ पार, १२ चॅनेल अवॉलाईट

२. ८ X ४ लेव्हल्स – ६ , ४ X  ४ लेव्हल्स – ६

३. दार आणि खिडकी – प्रत्येकी दोन चौकटी

४. पार्श्वभागी काळ पडदा

५. ध्वनिव्यवस्था – ४ फुटमाईक्स, २ हँगिंग माईक्स

६. २ टेबल, ४ खुर्च्या

७. परगावच्या संघांसाठी अल्पदरात निवास व्यवस्था. त्यासाठी आगाऊ सूचना देणे आवश्यक आहे.

८. प्रोजेक्टर

 

*** तळटीप : कोविड – १९ च्या बदलत्या स्थितीनुसार तत्कालीन  शासकीय नियमांनुसार अंतिम फेरीच्या कार्यक्रमात बदल होऊ शकतो.

 

 

 

 

 

Comments are closed.